राजकीयमहाराष्ट्र

राष्ट्रवादी-भाजप -उद्धवसेनेच्या‎ ‘सहकारा’ची अकोल्यात सत्ता

अकोला, अकोट व बार्शीटाकळी कृषी‎ उत्पन्न बाजार समितीचे निकाल‎ शनिवारी जाहीर झाले. अकोला बाजार‎ समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी‎ काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट),‎ भाजपचा सहभाग झालेल्या सहकार‎ पॅनलने विजयश्री खेचून आणली तर‎ वंचित बहुजन आघाडीचा धुव्वा‎ उडाला.

अकोल्यात सहकारच्या १५‎ जागा निवडून आल्या.अन्य तिघांचाही‎ सहकारला पाठिंबा असल्याचे चित्र‎ आहे.‎ अकोटात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,‎ प्रहार जनशक्ति पक्षाच्या नेत्यांनी एकत्र‎ येत स्थापन केलेल्या सहकार पॅनलने‎ मुंसडी मारली. बार्शीटाकळीत काँग्रेस,‎ शिवसेना, भाजपशी निगडीत सहकार‎ नेत्यांनी एकत्र येत गठित केलेल्या‎ शेतकरी संघर्ष पॅनलने झेंडा‎ फडकवला.‎ राज्यात महाविकास आघाडी‎ (मविआ) विरूद्ध भाजप असा सामना‎ रोज रंगत असला तरी बाजार‎ समितीच्या निवडणुकीत मविआ व‎ भाजपने सोयीची आघाडी केल्याचे‎ दिसून आले.

पुढेही याच पॅटर्नची पुनरावृत्ती

कृषी उत्पन्न बाजार समितीची‎ निवडणूक महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस,‎ शिवसेना( ठाकरे गट) आणि भाजप नेत्यांनी एकत्र येत‎ सहकार पॅनलच्या माध्यमातून लढली. परिणामी ग्रामपंचायत‎ व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दबदबा असल्यानंतरही‎ वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले.‎ स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीत सर्व मुख्य‎ पक्ष एकत्र आल्यासच वंचित बहुजन आघाडीचा पराभव‎ शक्य आहे, असा संदेश या निवडणुकीतून मिळाला असून,‎ याच पॅटर्नची पुनरावृत्ती आगामी निवडणुकीत होईल काय, हे‎ पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.‎

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel