सोलापूरच्या प्रलंबित विमानसेवेच्या विषयावर जातीने लक्ष घालणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

सोलापूर विकास मंचच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना निवेदनासह देण्यात आले प्रतिकात्मक विमान
सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करुन सोलापूरकरांच्या समस्या सोलापूर विकास मंचच्या वतीने शासनाकडून सोडवुन घेत आहेत. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा हा सोलापूरकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असुन केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी ह्या बाबत राज्य शासनाला मार्गदर्शक सुचना आणि आदेश पारित केले असुनही आजतागायत होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू झाली नसल्याने सोलापूरकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि लाखो तरुणांना नोकरी आणि व्यवसाया निमित्त कायमस्वरूपी सोलापूर सोडून जाण्यास नाइलाजास्तव भाग पडले असल्याची कैफियत महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी मांडली.
सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांच्या समवेत बैठक, चर्चा आणि निवेदनांची अनेकवेळा अदान प्रदान करण्यात आले आहे आणि सातत्याने पाठपुरावा देखील करुनही आजतागायत सोलापूरांना विमानसेवे पासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती रोहित मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. त्यावर राहुल नार्वेकर यांनी आपण सोलापूरकरांच्या मुलभुत समस्यांचे निराकरण करण्यासाठी ह्या विषयावर जातीने लक्ष घालुन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य ते कारवाई साठीचे निर्देश पाठवले जाईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांना दिले. ह्यावेळी रोहित मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोलापूर विकास मंचच्या निवेदनासहित विमानाची प्रतिकृती भेट दिली.