सोलापूर बातमी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा सोलापुरच्या वतीने सोलापुर महापालिका आयुक्त मा शीतल तेली उगले यांना चंद्रकांत मग्रूमखाने या समाज बांधवावर झालेल्या अन्याया विरोधात न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले

सोलापुर: येथील सातरस्ता ते जगदंबा चौक या रोड कडेला असणाऱ्या मग्रुमखाने यांचे 40 वर्षापासून फुटवेअर दुकान महापालिका परवानगी व पावती असताना देखील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कसलीही सूचना न देता जेसीबी पाडून मग्रुमखाने यांच उदर निर्वाहचे साधन संपविले आहे त्यामुळे संघटनेकडून समाज बांधवाला न्याय देऊन त्यांना आहे त्या ठिकाणी दुकान लावण्यास परवानगी द्यावी ही विनंती आयुक्ताना केली यावेळी प्रदीप लांबतुरे, शहर अध्यक्ष परशुराम मब्रुखाने,शहर अध्यक्ष शावरप्पा वाघमारे,बाळासाहेब आळसंदे,राजू सातपुते, ,राजू कर्दम, मोहन मब्रुखाने, धुंडप्पा सनके,रोहित मब्रुखाने,पत्रकार लक्ष्मण चाबुकस्वार सह आदी समाज बांधव उपस्थित होते