सोलापूर बातमीशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

सामान्य नागरिकांनी तृतीयपंथीयांना स्वीकारून आपल्यात सामावून घ्यावे!

तृतीयपंथीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून अपेक्षित प्रयत्न होताना दिसून येत आहे. समाज माध्यमातून तृतीयपंथीयांविषयी सकारात्मक जनजागृती आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी देखील तृतीयपंथीयांना चांगली वागणूक द्यावी, त्यांना स्वीकारावे आणि त्यांना आपल्यात सामावून घ्यावे, असे आवाहन तोसवान विद्यापीठ, अमेरिका येथील तज्ञ डॉ. पल्लवी गुहा यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. पल्लवी गुहा यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमाद्वारे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, डॉ. सानवी जेठवाणी, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कौशल्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अंबादास भासके यांनी करून दिला.

डॉ. पल्लवी गुहा यांनी सरकार, संशोधक व अभ्यासक तृतीयपंथीयांचे जीवनमान बदलू शकतात. तसे प्रयत्न होताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तृतीयपंथीयांच्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही खूप कौतुकाची गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, तृतीयपंथीयांचे जीवन, त्यांची प्रगती, आरोग्य आणि त्यांच्या समस्या याबाबत चर्चा व मंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतलेला आहे. त्यांना प्राथमिक ते पदवी व संशोधनापर्यंत शिक्षण मिळण्यासाठी देखील विद्यापीठाने पुढाकार घेणार आहे. याविषयी तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र निर्माण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देखील दाखल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर 21 मार्च 2025 रोजी सोलापुरात रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोफलीया यांनी समाजात काम करताना तृतीयपंथीयांविषयी काही केले नव्हते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुढाकाराने तृतीयपथीयांसाठी एक वेगळे कार्य हाती घेतल्याचे समाधान असल्याचे सांगितले. या परिषदेत डॉ. सानवी जेठवाणी, सचिन वायकुळे, तृतीयपंथी पहिले सरपंच ज्ञानेश्वर कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर 110 संशोधक, विद्यार्थी शोधनिबंध सादर केले आहेत. एकूण 250 जणांचा यामध्ये सहभाग आहे. या कार्यक्रमासाठी तृतीयपंथी तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्रा. तारीक तांबोळी यांनी मानले.

फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, ब्रिजमोहन फोफलीया, डॉ. सानवी जेठवाणी, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. अंबादास भासके आदी.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)