महाराष्ट्र

ICC Men’s T20 World Cup 2024 : गिल आणि पंड्याला मिळणार डच्चू? कर्णधार रोहितचा निर्णय ठरणार महत्वाचा.

मुंबई – तुफानी फलंदाजी करत आफगाणिस्तानविरुद्धची टी-२० सामन्यांची मालिका गाजवत असलेले यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे येत्या काळात होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवड समितीवर प्रभाव पाडत आहेत.

इतकेच नव्हे तर जयस्वालमुळे शुभमन गिलचे तर दुबेच्या अष्टपैलु खेळीमुळे हार्दीक पंड्या यांचे टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघातील स्थान धोक्यात आले आहे. नियमित कर्णघार रोहित शर्मा ही स्पर्धा खेळणार असल्याने त्यासाठी जेव्हा संघ निवड होइल तेव्हा रोहितचीच मर्जी विचारात घेतली जाइल व तो या चार खेळाडूंपैकी कोणत्या दोन नावांना झुकते माप देतो यावर अन्य दोन खेळाडूंचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात गिलने फारशी सरस कामगिरी केली नाही. तसेच आता दुसरा सामना जयस्वालने गाजवल्याने त्याचे संघातील स्थान निश्‍चित मानले जात आहे. त्याच बरोबर सध्या दुखापतीमुळे टी-२० संघातून बाहेर असलेला अष्टपैलु हार्दीक पंड्या कधी संघा परतेल सांगता येत नाही. मात्र, त्याच्या जागी निवड झालेल्या शिवम दुबेने आपले अष्टपैलुत्व अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सिद्ध केल्यामुळे संघ निवड करताना केवळ रोहितच नव्हे तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

जयस्वालने दुसर्या टी-२० सामन्यात गिलच्या जागी संधी मिळताच तोडफोड फलंदाजी करत ६८ धावांची खेळी केली. तसेच पहिल्या दोन्ही सामन्यात दुबेने गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल कामगिरी केली. त्यामुळे खुद्द रोहितची प्रभावीत झाला असून हे सामने संपल्यावर त्यांच्यात झालेल्या चर्चेमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. या तीघांसह विराट कोहलीही थट्टा मस्करी करताना दिसल्याने गिल व पंड्यासाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. याबाबत बीसीसीआयच्या सुत्रांनी काहीही बोलण्यास नकार दिला असला तरीही कर्णधाराचे मत संघ निवडीदरम्यान विचारात घेतले जाते असे सांगत सुचक विधान केले आहे.

#INDvAFG 2nd T20 : कर्णधार रोहितने रचला इतिहास, ‘या’ बाबतीत केली ‘धोनी-सरफराज’ची बरोबरी….

दुबेने पहिल्या टी-२० सामन्यात एक गडीबाद केला तसेच फलंदाजीत ६० धावांची खेळीही केली. दुसरीकडे गिलच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जयस्वालने दुसरा सामना गाजवताना ३४ चेंडूत ६८ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे बक्षिस वितरण प्रसंगी रोहितने या दोघांचे केलेले कौतुक खूप काही सांगून जात आहे. पंड्याला होत असलेल्या सततच्या दुखापती व गिलच्या फलंदाजीत सातत्य नसल्याने त्यांच्या जागी जयस्वाल व दुबे टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाटी दावेदार निश्‍चितपणे मानले जात आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आता थेट टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेद्वारेच आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणार असल्याने या मालिकेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

आगरकर काय निर्णय घेणार?

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता तेव्हा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित व कोहली यांच्याशी चर्चा केली होती व त्यावेळी या दोन्ही खेळाडूंनी टी-२० विश्‍वकरंडक खेळणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यापूर्वी सराव म्हणून अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठीही उपलब्ध असल्याचे कळवले होते. त्यामुळे त्यंची निवड झाली. आता गिल व पंड्या यांनाच झुकते माप द्यायचे की सध्याचे फलंदाजीतील सातत्य पाहून जयस्वाल व दुबेवर विश्‍वास ठेवायचा यापैकी आगरकर कोणता निर्णय घेतात व त्याला निवड समितीतील अन्य सदस्य पाठींबा देतात का याकडे आता लक्ष राहणार आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel