सोलापूर महानगरपालिका

सोलापुरात पूरग्रस्तांचा आक्रोश – ‘घरं पाण्यात, रस्ते बंद; मदतीसाठी कोणीच नाही…

सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबांचे संसार पाण्यात बुडाले आहेत, तर काही गावांमध्ये लोक घरातच अडकून पडले आहेत.

सीना नदीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिक रडवेल्या अवस्थेत आहेत. तिर्हे गावात अनेक घरांना पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिकांनी सांगितले की, “पाण्यामुळे घरातल्या वस्तू, धान्य, कपडे सगळं नष्ट झालं. मुलं, वृद्ध, महिला घरात अडकून आहेत. सुरक्षित ठिकाणी जायला रस्तेच नाहीत.”

लोकप्रहार न्यूज नेटवर्कला मिळालेल्या व्हिडिओमध्येही स्पष्ट दिसतं की, गावातील लोक पाण्याच्या उस पार थांबून मदतीची प्रतिक्षा करत आहेत. गावाला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले असल्याने संपर्क तोडला गेला आहे.

पूरग्रस्तांचा प्रशासनाकडे आक्रोश आहे की, अद्याप कोणीही पाहणीसाठी आलेलं नाही. स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, “आम्ही संकटात असताना आमदार, खासदार, अधिकारी कुठे आहेत? आमचं जगणं धोक्यात आलं आहे. तात्काळ मदत मिळाली नाही तर मोठं संकट ओढवेल.”

सध्या सीना नदी परिसरात परिस्थिती गंभीर असून नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे…..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia