सोलापूर महानगरपालिकासोलापूर बातमी

सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी सेंट्रल कारखान्याला दिली भेट…

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये आगीची घटना घडली त्या कारखान्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे,श्रीनिवास गड्डम, चेंबर ऑफ कमर्सचे राजू राठी, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक कार्यकारी अभियंता तपंडके व मन्सूरी परिवारातील सदस्य उपस्थिती होते. यावेळी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कारखान्याचे परिसरातील संपूर्ण पाहणी केली व उपस्थित असलेल्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घडलेल्या घटने संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी फायरमन समीर पाटील,गौतम आव्हाड उपस्थिती होते. त्यानंतर आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी एमआयडीसी परिसरातील अग्निशामक विभागाच्या जागेच्या पहाणी केली या ठिकाणी बांधकाम सुरू असून लवकरच या बांधकाम पूर्ण होऊन या ठिकाणी अद्यावत अग्निशामक दलाच्या गाड्या सह अधिकारी व कर्मचारी येथे उपलब्ध करण्यात येईल. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी कारखान्याच्या अनाधिकृत बांधकामा संदर्भातील 9 टीम करण्याचा आले असून प्रत्येक टीम मध्ये तीन प्रतिनिधींच्या समावेशन करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये एक कनिष्ठ अभियंता, एक फायरमन, एक टॅक्स ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत अनाधिकृत बांधकाम, अग्निप्रतिबंध उपाय योजनेत संदर्भात पडताळणी, प्रतिबंधात्मक सूचना दिशा पलक यांची पडताळणी इत्यादींचे सर्वे सुरू असून त्याही ठिकाणी महापालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel