सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापूरात रिक्षातून मोबाईल लंपास – 18 हजारांचा सॅमसंग गायब!

सोलापूर : भाडे सोडून सुट्टे पैसे आणण्यासाठी गेलेल्या प्रवाशाचा मोबाईल रिक्षातूनच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रसुल हॉटेल परिसरात घडली आहे.

विजापूर नाका पोलीस ठाणे – गु.र.नं. ५८३/२०२६
भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा.

फिर्यादी :- भारत सटवाजी भिसे, रा. १ नं झोपडपट्टी, गोंधळी गल्ली, सोलापूर
आरोपी :- अज्ञात चोरटा
गेला माल :- १८,०००/- रु. चा निळे रंगाचा सॅमसंग मोबाईल

हकीकत अशी की –

दि. २४/०९/२०२६ रोजी सायंकाळी १७.४५ वा. चे सुमारास, रसुल हॉटेल, सोलापूर येथे फिर्यादीचा नमुद वर्णनाचा व किंमतीचा मोबाईल हा भाडे सोडून पैशाचे सुट्टे आणण्याकरिता सदर मोबाईल रिक्षात ठेवून गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेला आहे.

गोरगरीब प्रवाशाचे भाड्याचे पैसे आणि मोबाईल असा दुहेरी फटका बसल्याने नागरिक संतापले असून या चोरट्याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.

तपास :- पोहकॉ/ १२३५ फुटाणे-हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel