सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापुर – एकाच घरात दोन गटात तुंबळ हाणामारी – भावजयने कुटुंबासह येऊन दिराच्या तोंडावर वीट मारून केले रक्तबंबाळ, परस्पर गुन्हे दाखल!

सोलापूर : लक्ष्मी पेठ, बॉबी चौक, आमराई जवळील एकाच घरात राहणाऱ्या दोन भावांच्या कुटुंबात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकमेकांच्या डोक्यावर आणि तोंडावर वीट मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसात दोन्ही बाजूंनी परस्पर गुन्हे दाखल झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फौजदार चावडी पोलीस ठाणे – गु.र.नं. ७८३/२०२६
भा. न्या. सं. कलम ११८(१), ११५(२), ३५१(३), ३५२, ३(५) प्रमाणे गंभीर गुन्हा.

फिर्यादी :- नंदकुमार धोंडिबा रासेराव, वय-५१ वर्षे, रा. घरनं ९७/९८/९९ लक्ष्मी पेठ बॉबी चौक आमराई जवळ सोलापूर
आरोपी :- १) मनिषा सुर्यकांत रासेराव २) ऐश्वर्या सुर्यकांत रासेराव ३) तेजस्वीनी सुर्यकांत रासेराव ४) तुषार सुर्यकांत रासेराव सर्व रा. लक्ष्मी पेठ बॉबी चौक आमराई जवळ सोलापूर

हा आहे दुसऱ्या गटाचा आरोप –

दि. २३/१०/२०२६ रोजी रात्री २१.०० वा. चे सुमारास, फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे घरी असताना यातील आरोपी क्रं. १ ही फिर्यादीच्या भावाची पत्नी असून ती इतर आरोपी क्रं. २ ते ४ यांना घेऊन घरी आली.

मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून “तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस तक्रार केली का, तुम्हाला येथे राहू देत नाही, तुम्हाला खल्लास करतो” अशी धमकी देऊन शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच आरोपी क्रं. ४ याने रस्त्याचे कडेला पडलेली विट घेऊन फिर्यादीचे तोंडावर मारून तोंडाला नाकाजवळ गंभीर जखमी केले आहे.

याच घरातील दुसऱ्या गटानेही यापूर्वी गु.र.नं. ७८४/२०२६ अन्वये तक्रार दिली असून एकाच रात्रीत एकाच घरात दोन वेळा वीट हल्ला झाल्याने हा वाद किती विकोपाला गेला आहे हे दिसून येते. पोलिसांनी दोन्ही गटावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

तपास :- पोह/१३८५/कसबे- हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel