महाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

घोरपड वन्य प्राणी यांच्या गुप्त अंग तस्करी…

घोरपड वन्यप्राणी यांच्या गुप्तांग तस्करी प्रकरणी आज रोजी सोलापूर येथे तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे...

दिनांक 2 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोलापूर रेल्वे स्टेशन वर आरोपी घोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार सकाळपासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आलेली होती.

संशयित आरोपी एका चार चाकी गाडी मधून घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आले होते.

रेल्वे स्टेशन वरती आल्यावर ठरल्याप्रमाणे खबरी याने त्यांना ओळखले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना पकडून ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांच्याकडे 151 घोरपडीचे गुप्तांग सापडून आले आहेत.
सदर गुन्हेगार सराईत असून त्यांच्याकडून असे यापूर्वीही झाले असल्याचे समजते.

घोरपड वन्यप्राणी हा वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेडूल एक मध्ये येत असून अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण देण्यात आलेले आहे.
त्याची शिकार करणे व विक्री करणे याला दहा हजार रुपये दंड व सात वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा आहे.
सदर कारवाईसाठी मोलाची मदत मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे तसेच हेमंत केंजळे कराड यांनी केली.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमेंट बेन,मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण , उपवनसंरक्षक महादेव मोहिते
सोलापूर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, वनक्षेत्रपाल रोहितकुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, इरफान काझी, शशिकांत सावंत, वनरक्षक श्रीशिल पाटील, आश्विनी सोनके, योगेश जगताप, सायली ठोंबरे, रमेश कुंभार, सुरेश कुरले, रेणुका सोनटक्के, अनिता शिंदे, नितीन चराटे, वाहन चालक कृष्णा निरवणे हे उपस्थित होते.

चौकट: वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2/2, 9, 39,40, 48 अ,49अ व ब,50, 51, 57 अंतर्गत वन गुन्हा नोंद झालाआहे.

रोपीचे नाव: विठ्ठल सुग्रीव पाटोळे वय 29 ,
सुग्रीव रंगनाथ पाटोळे वय 60 रा. दोघे राहणार पिंपळा तालुका : वडवणी जिल्हा: बीड , बाळासाहेब लक्ष्मण डोरले वय 34 रा. चिखल बीड यांना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास चालू आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel