सोलापूरात पोलिसाला ऑटोने फरफटत नेले ; रिक्षा चालकावर जेलरोड पोलिसात गुन्हा..!

*सोलापूरात पोलिसाला ऑटोने फरफटत नेले ; रिक्षा चालकावर जेलरोड पोलिसात गुन्हा*
*सोलापूर –* वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यालाच ऑटोने फरफटत नेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना शांती चौक येथे घडली आहे.
*गुन्ह्याचा तपशील –*
• *पोलीस ठाणे –* जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर
• *वार्तापत्र –* पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर, माहिती कक्ष, दि. १४ सप्टेंबर २०२६
• *गु.र.नं. व कलम –* ५०८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ) प्रमाणे
• *घटना घडली तारीख, वेळ व ठिकाण –* दि. १२/०९/२०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वा. चे सुमारास, शांती चौक, सोलापूर
• *गुन्हा दाखल तारीख –* दि. १३/०९/२०२६ रोजी ०३.२३ वा.
• *फिर्यादी –* पो.कॉ. ४९५ निंबरे, नेमणूक शहर वाहतूक शाखा, सोलापूर उत्तर
• *आरोपी –* विशाल राहुल परदेशी, वय २५ वर्षे, रा. ६२, विजय नगर, सोलापूर
*नेमकी हकीकत काय?*
दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता शांती चौक येथे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना आरोपी विशाल परदेशी हा त्याच्या ताब्यातील ऑटो रिक्षा *क्र. MH १३ S CT ४०५१* ही बेदरकारपणे चालवत असल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक पोलिसाने त्याला थांबण्याचा इशारा केला असता, आरोपीने न थांबता ऑटो पुढे दामटली. फिर्यादी पोलीस कर्मचारी धावत जाऊन ऑटो पकडून रिक्षात बसत असताना आरोपीने त्यांना तसेच पुढे फरफटत ओढत नेले.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे हात धरून ढकलून देऊन रस्त्यावर खाली पाडले. यात फिर्यादीच्या डाव्या हाताला दुखापत झाली. आरोपीने जखमीला उपचारासाठी दाखल न करता तसाच पळून गेला.
या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करीत आहेत..!



