सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक
अ. भा. मराठी नाट्य परिषद, उपनगरीय शाखेचे रंगकर्मी पुरस्कार…
नाट्य कलावंत सुशांत शेलार व अजय तापकीर यांची प्रमुख उपस्थिती..

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेच्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ कलावंताच्या सन्मानार्थ पुरस्कार सोहळा तसेच सध्या रंगभूमीवर कार्यरत असलेल्या कलावंतांना मा. सुशीलकुमार शिंदे रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या वर्षी रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता लोकमान्य टिळक सभागृह (ॲम्फी थिएटर), सोलापूर येथे हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभास आघाडीचे सिनेनाट्य अभिनेते सुशांत शेलार व धर्मरक्षक संभाजी मालिकेतील बहीर्जी नाईक यांची भूमिका साकारणारे अजय तपकिरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार मा. प्रकाशजी यलगुलवार हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, दक्षिण साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, बालरंगभूमीचे अध्यक्ष सीमा यलगुलवार, नाट्य परिषद मध्यवर्तीचे सहकार्यवाह दिलीप कोरके तसेच डॉ. मंदार सोनवणे अध्यक्ष पंढरपूर शाखा, प्रा. अजय दासरी अध्यक्ष महानगर शाखा, मध्यवर्ती नियामक मंडळाचे सदस्य डॉ. विश्वनाथ आवड, प्रा. तेजस्विनी कदम व सुमित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
अ.भा.म.ना.प. उपनगरीय शाखेच्या वतीने यंदाचे वर्षी दिले जाणारे पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत.
• विजयकुमार साळुंके पुरस्कृत डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती पुरस्कार – मा. रजनीश जोशी (सिनेनाट्य अभिनेते) सोलापूर.
• एस. एम. पाटील परिवार पुरस्कृत रंगभूमी संवर्धक सिध्दा पाटील स्मृती पुरस्कार – मा. नागेश भोसेकर (सिनेनाट्य संगीतकार) सोलापूर.
• शोभा बोल्ली व राजा बागवान पुरस्कृत रंगकर्मी लक्ष्मीनारायण आकेन स्मृती पुरस्कार – मा. अमीर तडवळकर (सिनेनाट्य अभिनेते) सोलापूर.
• मिलिंद व मंदार काळे पुरस्कृत रंगकर्मी संजीवनी काळे स्मृती पुरस्कार – मा. श्रीमती वनमाला किणीकर (ज्येष्ठ अभिनेत्री व दिग्दर्शक वय वर्षे 87) सोलापूर.
• प्रशांत शिंगे पुरस्कृत रंगकर्मी कमल ढसाळ स्मृती पुरस्कार – श्री. दत्तात्रय श्रीराम (ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माता)
यांना जाहिर झाला असून पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृती चिन्ह, आणि मानपत्र असे आहे.
या पुरस्कारासोबतच मा. सुशीलकुमार शिंदे रंगकर्मी सन्मान – 2024 ही पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.-
1.अश्विनी तडवळकर2. ऋतुराज आरसिद3. अमोल देशमुख4. राजेश जाधव
5. अशोक किल्लेदार 6. बाळकृष्ण निमसूडकर 7. अपर्णा जोशी 8. सुनंदा शेंडगे
9. सई दरेकर 10. अर्चना सलवारु 11. श्रीनिवास देशपांडे 12. कुबेर शास्त्री
13. अरविंद माने 14. श्याम चव्हाण 15. उमेश बटाणे 16. रमेश श्रावण
17. नमिता देशमुख
63 व्या महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धा सोलापूर केंद्रातील पारितोषिक प्राप्त नाट्यसंघांचा सत्कार
विजयकुमार साळुंके पुरस्कृत – प्रथम – विक्रमाचा घातांक क्ष (अ. भा. वा. सांप्रादायिक मंडळ, सोलापूर)
जयप्रकाश कुलकर्णी पुरस्कृत – द्वितीय – ती रात्र – (अनघ नाट्य मंदिर, सोलापूर)
कृष्णा हिरेमठ पुरस्कृत – तृतीय – एका उत्तराची कहाणी – (श्रुती मंदिर, सोलापूर)
सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.
तरी या समारंभास सर्व कलावंत रसिकप्रेक्षक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाट्यपरिषदेच्या उपनगरीय शाखेचे अध्यक्ष श्री. विजयकुमार साळुंके यांनी केले आहे