महाराष्ट्रराजकीय

माहीम येथील समुद्रातील बेकायदा धार्मिक स्थळ हटवले, राज ठाकरे यांनी अल्टीमेटम देताच प्रशासनाचा हातोडा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील सभेत माहीमच्या खाडीत धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा दावा केला होता. तसेच, हे बांधकाम न हटवल्यास त्याशेजारीच गणपती मंदिर बांधणार, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज सकाळीच हे अतिक्रमण हटवले आहे.

माहीमच्या खाडीतील अनधिकृत बांधकामावर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांनी काल हे बांधकाम पाडण्याची मागणी करताच काल रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पथकाचीही स्थापना करण्यात आली होती. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेवर आश्चर्य व्यक्त होत आहे.

काल रात्रीच आदेश, पथकाचीही स्थापना

माहीम येथील समुद्रातील बेकायदा धार्मिक स्थळाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित कताच ते धार्मिक स्थळ पाडण्यासाठी प्रशासनाने एक पथक तयार केले होते.
माहीम येथील समुद्रातील बेकायदा धार्मिक स्थळाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित कताच ते धार्मिक स्थळ पाडण्यासाठी प्रशासनाने एक पथक तयार केले होते.

माहीम दर्गा ट्रस्टचे म्हणणे…

दरम्यान, आता याप्रकरणी माहीम दर्गा ट्रस्टनेही प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी म्हणाले की, राज ठाकरे यांनी सभेत ड्रोन व्हिडीओद्वारे जी जागा दाखवली ती 600 वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी केवळ धार्मिक शिक्षण दिले जात होते. तेथे कोणतही बांधकाम करणार नव्हतो. तसेच, या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झाले असेल तर त्यावर सरकारने अवश्यक कारवाई करावी.

पोलिसांची काल रात्रीच पाहणी

आज सकाळी जेसीबीच्या मदतीने प्रशासनाने तोडक कारवाई केली.

राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर काल रात्रीच मुंबई पोलिसांनी माहीम येथील समुद्रातील त्या स्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर मुंबई शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांनी तत्काळ ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सात जणांचे पथक तयार करण्यात आले होते. आज सकाळी 8 वाजता पोलिस, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली. कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तोडक कारवाईला कुणाचाही विरोध नाही

अवघ्या अर्ध्या तासात अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या पथकाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम केवळ अर्ध्या तासात हटवण्यात आले. या स्थळावरील एक झेंडा आधी उतरवण्यात आला. त्यानंतर झटपट तोडक कारवाई करण्यात आली. शांततेत ही कारवाई करण्यात आली. यावेळी कोणाकडूनही विरोध झाला नसल्याचे मुंबई महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

राज ठाकरेंनी दाखवला होता ड्रोन व्हिडिओ

राज ठाकरे यांनी काल सभेत मुंबईच्या माहिम समुद्रातील बेकायदा दर्ग्याचे व्हिडिओ, फोटो दाखवले होते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार होतात. एक महिन्यात हा दर्गा हटवा, नाही तर त्याच्या शेजारीच आम्ही गणेश मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता. गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा इशारा दिला होता. नंतर वर्षभर हा मुद्दा बाजूला पडला. आता पुन्हा त्यांनी भोंगे बंद करण्याचा इशारा देताना तेव्हा आंदोलन करणाऱ्या 17 हजार मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

संबंधित वृत्त

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel