सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापूर शहर मध्य मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देणेस प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्याकडे मागणी…

नुकतेच लोकसभेचे निवडणूक पार पाडले असून सोलापूर लोकसभा मतदार संघात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदारसंघात तीन लाखापेक्षा जास्त मुस्लिम मतदार असून यात सोलापूर शहर मध्य मध्ये जवळपास एक लाख मुस्लिम मतदार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत काँग्रेस पक्षाच्या वतीने सदर मतदार संघात उमेदवारी देण्यात आलेली नाही. आ.प्रणितीताई शिंदे हे खासदार झाल्याने सदर मतदारसंघ रिक्त झालेले आहे. सुरूवातीपासून सदर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला असून मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिलेले आहे.
तरी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्या काँग्रेस पक्षाकडे ठेवण्यात यावे आणि सदर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिल्यास हमखास निवडून येण्याची शाश्वती आहे म्हणून सदर मतदार संघात मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी. असे निवेदन सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष श्री.जुबेर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री.नाना पटोले यांना निवेदन दिले. सोलापूर शहर मध्य मधून श्री.जुबेर कुरेशी, माजी महापौर आरीफ शेख, शकील मौलवी, रूस्तुम कंपली, हाजी तौफिक हत्तुरे, कु. फिरदोस पटेल, शौकत पठाण आदी जेष्ठ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बालाजी सरोवर, सोलापूर येथे प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांची भेट घेवून उमेदवारी मिळण्यास मागणी केली.
यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, म.इलियास शेख, अब्दुल रजाक कादरी, मुर्तुज काझी, कय्युल बलोलखान, परवेज जमादार आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login