सोलापूर बातमी

सोलापूरकरांचा स्नेहसंवाद व सन्मान, सोलापूरकर दुबईत एकत्रित…!

दुबईमध्ये सोलापूरच्या आणि महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या मान्यवरांचा स्नेहसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या विशेष सोहळ्यात आमदार श्री. सुभाष देशमुख यांनी उपस्थितांना प्रेरित करत, “आपण सोलापूरच्या मातीतून उभं राहून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. आता वेळ आलीय आपल्या सोलापूरच्या वैभवासाठी एकत्र येण्याची, त्याच्या विकासासाठी हातभार लावण्याची. चला, एकत्र येऊ, पुढे जाऊ आणि आपल्या सोलापूरचं स्वप्न साकार करूया!” असं आवाहन केलं.

यावेळी उपस्थिती मान्यवरांनी संवाद साधतं सोलापूरच्या मार्केटिंग साठी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी सोलापूर दुबई फोरम स्थापन करून त्याच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी यापुढे देखील कार्यरत राहण्याचे निश्चित केले..
यावेळी व्याख्याते गणेश शिंदे, चंद्रशेखर जाधव, सोमनाथ पाटील, अमित जैन, प्रकाश पवार, यासह विविध मान्यवर उपस्थिती होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.