सोलापूर बातमी

सोलापुरात रिक्षात आढळले तब्बल चौदा विद्यार्थी….

अवैधरीत्या रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम गुरुवारी हाती घेतली. यात शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी आणि सायंकाळी थांबून वाहतूक पोलिसांनी ३५ रिक्षांवर गुरुवारी दंडात्मक कारवाई केली.

गुरुवारी सहायक पोलिस निरीक्षक हिना कलाल व फौजदार नागेश येणपे यांच्या पथकाने पानगळ शाळा, सोशल उर्दू शाळा, किडवाई चौक, फोटपाडी चौक व एस. व्ही. सी. एस. शाळा या ठिकाणी विशेष शाळा मोहीम घेऊन धोकादायकरित्या लहान मुलांना बसवून नेणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांची भांबेरी उडाली. काही ठिकाणी आमच्यावर कारवाई करू नका, अशी विनंती रिक्षा चालक करत असल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी दंडाची रक्कम आम्ही कशी भरावी, असा सवालही पोलिसांसमोर उपस्थित केला….

यापुढेही कारवाई सुरू राहणार
धोकादायकरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर आम्ही कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार वाहतूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले….!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel