सोलापूर बातमी

सोलापुरातील राजेंद्र चौकात वाहनधारकांवर कारवाई मुळे वाहन चालकांची तारांबळ

सोलापूर : शहरातील राजेंद्र चौक परिसरात शनिवारी रात्री पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. चालकांकडे परवाना, विमा, आरसी बुक, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र आहे का याची पडताळणी करण्यात आली. तसेच हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, ट्रिपल सीट वाहनधारक, सिग्नल तोडणारे, अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक अशा नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी अनेक वाहनांना दंड आकारण्यात आला असून, काही वाहनं जप्तही करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये काही काळ धांदल उडाली होती. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी अशा मोहीमा वेळोवेळी राबविणे आवश्यक असल्याचे मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले.

वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,
“वाहनधारकांनी सर्व कागदपत्रे बरोबर ठेवावीत, वाहतुकीचे नियम काटेकोर पाळावेत. नियमभंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.”

या मोहिमेमुळे परिसरातील नियम तोडणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाल्याची चर्चा होत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login