सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोशल उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड परीक्षेत दैदिप्यमान यश…

शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था सोशल उर्दू हायस्कूल, सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या फेरीत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, ‘इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड, मुंबई’ द्वारे आयोजित या परीक्षेत प्रशालेतील पाचवी ते नववीच्या एकूण ११५ विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे एकूण २४ विद्यार्थ्यांनी पदके (Medals) पटकावली आहेत. त्यामध्ये:
०९ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक (Gold Medal) मिळवले.
०९ विद्यार्थ्यांनी रौप्यपदक (Silver Medal) मिळवले.
०६ विद्यार्थ्यांनी कांस्यपदक (Bronze Medal) आपल्या नावे केली.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रसूल चौधरी सर, उपमुख्याध्यापक इम्तियाज शाब्दी, पर्यवेक्षिका यास्मिन शेख, रिझवान शेख, अल्ताफ हुसेन कुमठे आणि निमंत्रक जुनैद शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी विद्यार्थ्यांना जुनैद शेख, सुल्तान अख्तर, शोएब उटकूर, शाहरूख महाडी, सय्यद जहिरुद्दीन, पटेल अब्दुल रज्जाक यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel