भगवान गौतम बुद्धाच्या शांततेच्या विचाराची जगाला गरज….भालशंकर

भगवान गौतम बुद्ध यांच्या शांततेच्या विचाराची जगाला गरज असून भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने मार्गक्रमण केल्यास जगामध्ये शांतता नांदेल असा विश्वास बौद्ध साहित्य मंडळाचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केला .
ते नालंदा नगरातील सुप्रसिद्ध अशा नालंदा बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन पवार हे उपस्थित होते तसेच यावेळी नालंदा नगर बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष शरद वाघमारे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आम्रपाली गाडे याही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर पुष्प अर्पण करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत सत्कार नंतर मोहन पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले की माणसाचा राग हा फक्त नऊ सेकंदाचा असतो नऊ सेकंद शांत राहिले तर पुढे घडणारा अनर्थ टळू शकतो शांतता आणि संयम हे भगवान गौतम बुद्धाच्या विचारातून येते असेही ते म्हणाले यावेळी वाघमारे ताई, बोधिसत्व वाघमारे, कवी चंद्रकांत मागाडे तसेच शरद वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या सरचिटणीस मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे यांनी केले सूत्रसंचालन सशांक वाघमारे यांनी केले तर चंद्रमणी वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मंडळाचे खजिनदार विजयकुमार क्षीरसागर, मुकुंद चंदनशिवे ,नागोराव कांबळे, हनुमंतप्पा वाघमारे, सुशीलचंद्र भालशंकर, अशोक प्रधान, सुशीलादेवी भालशंकर, रुक्मिणी खंडागळे ,आक्का गायकवाड मंगल शिंदे, सुरेखा वाघमारे ,मंगल कांबळे, चारुशीला भालशंकर , नेहा वाघमारे, सिदगणेश ताई कुमारी ज्योती खंडागळे यांच्यासह शेकडो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. बुद्ध वंदना आणि प्रवचनानंतर नालंदा नगर, गणेश नगर ,सिटीजन पार्क, जाई जुईनगर ,निखिल पार्क आणि परिसरातील बौद्ध उपासक उपासिका यांच्यासाठी खीरदान करण्यात आले.



