सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी

सोलापूरात विवाहितेचे 14 वर्ष छळ , विवाहितेने जीवन संपविले; पती-दीरावर गुन्हा…

सोलापूर, 3 जून 2026 : कुमठा नाका येथे सासरच्या मंडळींकडून पैशाची मागणी, “मूल होत नाही” म्हणून हिणवणे आणि सततच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती व दीराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?
विजापूर, कर्नाटक येथील लक्ष्मण शंकर ओरेंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची बहीण सविता हिचा कुमठा नाका येथील रवि हुच्चे याच्याशी विवाह झाला होता.

14 वर्षांचा छळ
दि. 14/04/2012 ते दि. 26/04/2026 या 14 वर्षांच्या कालावधीत आरोपी 1) रवि हुच्चे – पती आणि 2) किरण हुच्चे – दीर, रा. कुमठा नाका यांनी सविताचा छळ केला.

छळाचे स्वरूप
1. वारंवार पैशाची मागणी करणे.
2. “मुल होत नाही” असे म्हणून हिणवणे.
3. विविध कारणांवरून सतत मारहाण करणे.
4. शारीरिक व मानसिक त्रास देणे.

परिणाम
सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून सविताने आत्महत्या केली. आरोपींनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले, असे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलिसांनी भा.न्याय संहिता कलम 108, 85, 3(5) प्रमाणे गु.र.नं 559/2026 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोसई वाघमारे – 9850329959 तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel