सोलापूर बातमीमनोरंजनमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापूरातील पद्मशाली समाजाच्या कन्या अनुष्का आरकाल ही जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत…

'पद्मशाली समाजासाठी अभिमानाचे क्षण'....!

सोलापूर – येथील पद्मशाली समाजातील कन्या कु. अनुष्का श्रीकांत आरकाल ही पद्मशाली शिक्षण संस्थेच्या डी. आर. श्रीराम इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थ्यींनी असून सहावीत शिक्षण घेत आहे. अनुष्काला भरतनाट्यम् ही कला लहानपणापासूनची आवड आहे. नुकतेच तिने आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे झालेल्या राष्ट्रीय ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावले. विविध राज्यातून आलेल्या तब्बल 40 स्पर्धकांतून तिची तिस-या क्रमांकासाठी निवड झाले आहे.

जागतिक स्तरावरील ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने सोलापूर व पद्मशाली समाजातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. बुधवार दि. १७ जून रोजी जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत तिला यश मिळण्यासाठी तिला अधिक गुण मिळण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘युट्यूबवर’ तिच्या नावाने व्हिडिओ पाहून ‘लाईक’ ‘शेअर’ व ‘सपोर्ट’ मिळून स्पर्धेत तिला यश मिळेल. तसेच जेवढ्या प्रमाणात लाईक, शेअर व सपोर्ट मिळेल त्याआधारे तिला स्पर्धेसाठी अधिक गुण प्राप्त होणार आहे, पद्मशाली समाजातील प्रत्येक व्यक्तीला आवाहन आहे की, तिला यश मिळण्यासाठी प्रत्येकाने युट्यूबवर जाउन तिच्या व्हिडिओला बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत लाईक, शेअर आणि सपोर्ट करावेत अशी विनंती सोलापूरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia