स्मृती वन उद्यानात सोलापूरकरांनी बनवले सीडबॉल!
‘सामाजिक वनीकरण’च्या सहकार्याने इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

सोलापूर : सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेल्या निसर्गाला पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि आगामी पावसाळ्यात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापुरात एक कौतुकास्पद मोहीम पार पडली. रविवारी सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने ‘इको फ्रेंडली क्लब’ने स्मृती वन उद्यानात शेकडो सीडबॉल बनवले.
“निसर्ग आपल्याला भरभरून देतो, आता आपली वेळ आहे!” या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात पर्यावरणप्रेमी सोलापूरकर नागरिक, तरुण आणि बाल गोपाळांनी मोठा प्रतिसाद दिला. अवघ्या दोन तासांच्या कालावधीत शेकडो सीडबॉल (बीज गोळे) अत्यंत उत्साहात तयार करण्यात आले.
तयार करण्यात आलेले शेकडो सीडबॉल आगामी आषाढी वारी आणि ट्रेकिंगदरम्यान सोलापूर परिसर आणि महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले, डोंगर तसेच मोकळ्या माळरानांवर टाकण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यात या बिया रुजून त्यांचे मोठ्या वृक्षांत रूपांतर होईल.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे, सहायक वनसंरक्षक शुभांगी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. वनपाल महेश हिरेमठ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रारंभी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे यांनी सीडबॉल कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले.
सीडबॉल तयार केल्यानंतर झाडांच्या शीतल सावलीत सर्वांनी एकत्र बसून ‘वनभोजना’चा मनसोक्त आनंद घेतला.
या उपक्रमात इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, सदस्या डॉ. सुमेधा कंदलगावकर, शिक्षक चंद्रशेखर गुंजले, बांधकाम विभागाचे अधिकारी राजेंद्र जमादार, अर्चना जमादार, प्रा. शर्मिला करपे, कनिष्का करपे, डॉ. संतोष स्वामी, डॉ. गिरिजा स्वामी, अनया स्वामी, महावीर लाळे, रोहिणी तळेकर, जय भडंगे, केदार जोशी, सचिन जगताप, अमोल तारापुरे, बसवराज परांडकर, श्रुती कुलकर्णी, सुरेश नारायणकर, गीतांजली पगडीमल, मोहन कुरापाटी, माधव पानसे, रजनी करंजकर, सुधीर नागलगाव, रुद्र कंदलगावकर, ऋषी कंदलगावकर, सागर कुरापाटी, व्यंकटेश चिलवेरी, प्रदीप डेरे, प्रत्युष ढेरे, नमन लाळे, सौजन्या लाळे, अर्णव देवसाळे, गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, आराध्या कोकणे, पूजा कोकणे, प्रणव देवसाळे, डॉ. सचिन कुलकर्णी, सक्षम कुलकर्णी, नारायणी कुलकर्णी, रेवांशी पवार, श्रीनिवास तारापुरे, अनुष्का तारापुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
—
बच्चे कंपनीचा उत्साही सहभाग
मोठ्यांसोबतच या उपक्रमात माही, रुद्र, राही, वीर, राई, ईरा, ओम, निर्मिती, आणि पार्थ या आणि इतर बच्चे कंपनीने स्वतः चिखलात हात घालून सीडबॉल तयार करण्यात दाखवलेला उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी आनंद व्यक्त केला.



