सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापुरातील 300 वर्षांची मोहरम परंपरा पुन्हा चर्चेत , 51 मशालींना परवानगी द्या – शिवसेनेची मागणी

सोलापूर : शहरातील मोहरम उत्सवामध्ये गेल्या सुमारे ३०० वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक ५१ मशालींच्या मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा वक्फ अधिकारी सोलापूर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याबाबत २४ जून २०२४ रोजी अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे. सोलापूर शिवसेनेचे अल्पसंख्याक अध्यक्ष गफूर शेख यांनी पक्षाच्यावतीने अधिकृतपणे पत्र देऊन व जिल्हा वक्त अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता त्या पाठपुराव्याला आता यश येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .

पत्रानुसार, मोहरम कमिटी सोलापूर तसेच संबंधित वक्फ मंडळाने मोहरम उत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे सोलापूर शहर अध्यक्ष गफूर शेख यांनी केलेल्या अर्जाचा उल्लेख करताना, सोलापूर शहरात मोहरमच्या निमित्ताने निघणाऱ्या दुर्देश सवारीच्या मिरवणुकीत पारंपरिक ५१ मशाली घेऊन जाण्याची धार्मिक व ऐतिहासिक परंपरा अखंडपणे सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ब्रिटिश काळापासून ही परंपरा सुरू असून ती मोहरम उत्सवाचा अविभाज्य भाग मानली जाते.
दरवर्षी मोहरम काळात राज्यभरातून हजारो भाविक, नागरिक व श्रद्धाळू सोलापूरमध्ये दाखल होत असतात. दुर्देश सवारीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहत असल्याने या पारंपरिक कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की, २६ जून २०२४ रोजी सकाळी व सायंकाळी निघणाऱ्या दुर्देश सवारीच्या मिरवणुकीत पारंपरिक ५१ मशालींसह परवानगी देण्यात यावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.
या पत्रामुळे मोहरममधील पारंपरिक ५१ मशालींच्या मिरवणुकीसंदर्भातील वादावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे शहरातील नागरिक आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia