सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सहकारी बँका टिकल्या पाहिजेत -आमदार देवेंद्र कोठे नगरसेवक म्याकल यांचा सत्कार महावीर बँकेला 8.91 कोटी नफा, 10% लाभांश जाहीर…

सोलापूर – सोलापूर शहरातील सहकारी बँका टिकल्या पाहिजेत यासाठी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. असे प्रतिपादन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी श्री महावीर अर्बन को ऑफरेटिव्ह बँकेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन केले. बँकेला यंदावर्षी 8.91 कोटी नफा झाला व सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
देवेंद्र कोठे म्हणाले आपल्याला कर्ज पाहिजे तेव्हा आपण कमी व्याजदर असलेल्या बँका म्हणजे नॅशनल बँका शोधतो आणि ठेवी ठेवताना जास्त व्याजाची अपेक्षा असते त्यामुळे सहकारी बँकांना तारतम्या पाळून बँक चालवावी लागते. अशा परिस्थितीत बँकेने प्रगती करीत आहे. 38 कोटी वरून 500 पर्यंत मजल मारली ते गौरवास्पद आहे. त्यामुळे सर्व संचालक व सभासदांचे अभिनंदनास पात्र आहात. त्यामुळे सोलापूरातील सहकारी बँका टिकल्या पाहिजेत यासाठी सामाजिक आणि राजकिय कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले. 
या वेळी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानेश्‍वर म्याकल यांचा स्विकृत नगरसेवक झाल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे बँकेचे अध्यक्ष दिपक मुनोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दशरथ वडतीले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष श्री. इंद्रमलजी जैन यांनी प्रास्ताविक केले.
बँकेची सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणा अवघ्या 20 मिनिटात सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेला संबोधित करताना बँकेचे अध्यक्ष श्री दिपक मुनोत यांनी गेल्या वर्षभरातील बँकेचा प्रगतीचा  अहवाल उपस्थित सभासदांसमोर मांडला. यामध्ये प्रामुख्याने बँकेने ग्राहकांसाठी चालू केलेलं मोबाईल बॅकिंग, आयएमपीएस, युपीआय या डिजिटल सुविधांव्दारे आजर्यंत 1200 कोटी रूपयांची उलाढाल यशस्वीरित्या झाली आहे, याची माहिती दिली. बँकेने 2012 साली 38 कोटी ठेवी वरून आजअखेर बॅकेच्या ठेवी 530 कोटी ठेवीचा पल्ला पार केला आहे. तसेच बँकेच्या स्वमालकीच्या तीन वास्तू असून मुख्य शाखेसाठी कॉर्पोरेट ऑफिस उभारण्यासाठी सभासदांनी सूचना केल्या आहेत.
सदर वार्षिक सर्वसाधारण सभेस व्हा. चेअरमन संजय सेठीया, संचालक रविंद्र गुजराथी, नारायण गंजी, गोंविद भैय्या, गिरीष देवरमनी, गौतमचंद संचेती, श्रीनिवास चिलका, संतोष भंडारी, भैरूलाल कोठारी, चेतन बाफना, राजशेेखर हिरेमठ, अरूण साळुंके, सौ. माधुरी पारेख, सौ. पूनम लोणावत, नितीन नावंदर, नंदकिशोर उदगीरी, पोपटशेठ पुनमिया, अतुल सोनिग्राम आदी संचालक उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेेला जिल्हा मुख्य सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग राजपूत, केतनभाई शहा, कल्पेश मालू, ओमप्रकाश लड्डा, गिरीष गांधी, कुमारपाल निमाणी, रामवल्लभ जाजू, पुरूषोत्तम बलदवा, धन्यकूमार खाबिया, अशोक संकलेचा, पेंटप्पा गड्डम, काशिनाथ गड्डम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, अशोक छाजेड, जिनेंद्र सुराणा, जयचंद वेद, बस्तीमल संकलेचा, वीरचंद संकलेचा, ईश्‍वर मालू, दीनानाथ धुळम, मल्लेशम कोडम, रमेश जैन, सुनिल जैन, रंगनाथ येरमवार, केशवभाई शहा, किरण करकमकर, सहकार भारतीचे आगरधडे, विनायक राचर्ला, शाम येमूल, माजी नगरसेविका प्रमिला पल्ली, सरिता वडनाल, चंद्रकांत रमणशेट्टी आदी आणि सभासदांची प्रचंड गर्दी होती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)