सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम
सोलापुरात दुचाकी चोरांचा हैदोस, घरासमोरून 20 हजारांची दुचाकी चोरीला; चोरट्याविरुद्ध गुन्हा..!

सोलापूर, दि. २३ – घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफिक बाशा जातकर (रा. १५८, वैदवाडी, भवानी पेठ) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची सिल्वर रंगाची मोटारसायकल (क्र. एमएच १३ बीआय झेड ३८४८) दि. १४ ते १५ सप्टेंबर दरम्यान राहत्या घराजवळ हँडल लॉक करून ठेवली होती.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीवाचून सदर दुचाकी मुद्दाम लबाडीने चोरून नेली.
या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये २० हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



