सोलापूरात जागेच्या वादातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..!

सोलापूर – सोलापुरातील जानकर नगर, वाय चौक परिसरात जागेच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करून धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गु.र.नं. ७३९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(३), ३(५) प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी – सीमा नारायण जानकर, वय ४३ वर्षे, रा. ९/५२ जानकर नगर, वाय चौक, सोलापूर
आरोपी – १) सुजय दत्तात्रय टिकोळे २) अविष्कार सुधीर जानकर ३) सुधीर विजय जानकर (सर्व रा. जानकर नगर, वाय चौक)
हकीकत अशी की, दि. २७/०९/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वा. च्या सुमारास फिर्यादी सीमा जानकर या त्यांच्या मुलीसोबत त्यांच्या जागेजवळ वॉकिंग करत असताना, त्या जागेत पत्राशेड मारलेले दिसले. याबाबत फिर्यादीने आरोपी क्र. १ यास विचारणा केली असता, आरोपीने “ही जागा आमच्या मालकीची आहे, तू जास्त नाटक केलीस तर तुला व तुझ्या मुलीला खल्लास करून टाकेन” अशी शिवीगाळ व धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे केस व ड्रेस पकडून हातात असलेल्या कोणत्यातरी धारदार हत्याराने डाव्या हातावर मारून दोन बोटांना दुखापत केली. तसेच आरोपी क्र. २ व ३ यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून “तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद दि. २७/०९/२०२६ रोजी रात्री २२.४७ वा. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पो.ह. १३८५/कसबे हे करीत आहेत…



