सोलापूर – इथे राहायचं नाही, इथून निघून जा” म्हणत विवाहितेचा छळ, घरासाठी माहेरून 5 लाखांची मागणी!

सोलापूर : सासरी नांदत असलेल्या विवाहितेला किरकोळ कारणावरून हाताने मारहाण व शिवीगाळ करून “तु इथे रहायचे नाही तु इथून जा” अशी दमदाटी करत घर घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आण म्हणून मानसिक व शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सदर बझार पोलीस ठाणे – गु.र.नं. ९२५/२०२६
भा. न्या. सं. कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा.
गु.घ. ता. वेळ / ठि. :- मे २००४ ते दि. २८/०९/२०२६ रोजी दरम्यान फिर्यादीचे सासरी सोलापूर
गु.दा. ता. वेळ :- दि. २७/१०/२०२६ रोजी १९.५९ वा.
फिर्यादीचे नाव :- अनुसया बाळू शिंदे, रा. मौलाली चौक सोलापूर
आरोपीचे नाव :- १) बाळू – पती २) सखुबाई – सासू ३) लक्ष्मी – नणंद ४) सुरेश – दीर ५) सुजाता – जाऊ रा. सोलापूर
हकीकत अशी की –
वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी ही सासरी नांदत असताना यातील आरोपीत मजकूर यांनी मिळून फिर्यादीस किरकोळ कारणावरून हाताने मारहाण व शिवीगाळ करून “तु इथे रहायचे नाही तु इथून जा” असे म्हणून दमदाटी करत होते तसेच घर घेण्यासाठी ५ लाख रुपये माहेरून आणणे करीता तगादा लावून मानसिक व शारीरीक त्रास दिला आहे म्हणून.
पतीच्याच घरात विवाहितेला नकोशी करून पैशासाठी छळणाऱ्या या सासरच्या मंडळींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तपास :- पोह/१२७७/काळे हे करीत आहेत.



