सोलापूर बातमीसोलापूर क्राईम

SOLAPUR VIRAL VIDEO : प्रसूती झालेल्या महिलेला केस पेपरसाठी ताटकळत बसविल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल…

सोलापूर शहरात नव्याने स्थापन झालेल्या महिला व बाल रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे.सोमवारी सायंकाळी प्रसूती झालेली हेमलता सोळंकी या महिलेला ताटकळत बाहेर बसविल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले होते.संबंधित महिलेला वेदना होत होत्या,तरीही रुग्णालयातील र्मचाऱ्यांनी केस पेपर काढून आणा तरच तुमचं पुढील उपचार केला जाईल. असे महिलेने एका व्हिडीओ मध्ये माहिती दिली होती.सदर घटनेची अधिक माहिती घेतली असता,महिला व बाल रुग्णालयाच्या प्रमुख डॉ जयश्री ढवळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.संबंधित महिलेवर आम्ही उपचार करून त्याला डिस्चार्ज दिले आहे.

*सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल-
प्रसूती झालेल्या महिला सोमवारी सायंकाळी वेदना सहन करत सोलापूर शहरातील महिला व बाल रुग्णालयाच्या आवारात बसलेल व्हिडीओ समोर आला होता..प्रसूती झालेली महिला आणि तिची आई माहिती देताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले.गुरुनानक चौक येथील महिला व बाळ रुग्णालय नेहमी चर्चेत असते.सोमवारी सायंकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील एक बाळंतीण झालेली महिला पुढील उपचारासाठी महिला व बाळ रुग्णालयात दाखल झाली होती.दहा दिवसांपूर्वी महिलेची प्रसूती झाली होती.सिझेरियन झाल्याने महिलेच्या पोटाला टाके होते.टाके काढण्यासाठी आलेल्या महिलेला रांगेत उभारून केस पेपर काढण्याची सक्ती करण्यात आली.मात्र रुग्ण महिलेची बसण्याची देखील अवस्था नव्हती.महिला व बाळ रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी केसपेपरची सक्ती केली होती. असा आरोप सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये आहे.

*रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले;वैद्यकीय अधीक्षकांनी दिली माहिती-
महिला व बाल रुग्णालयाच्या प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ जयश्री ढवळे यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतली.डॉ ढवळे यांनी माहिती देताना सांगितले उत्तर सोलापूर तालुक्यातील महिला ही प्रसूतीसाठी 20 जून रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती.21 जून रोजी सिझेरियन करून त्याची प्रसूती करण्यात आली.27 जून रोजी संबंधित महिलेवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले होते.सिझेरियनचे टाके काढण्यासाठी पुन्हा एकदा सोमवारी सायंकाळी महिला व तिची आई रुग्णालयात आले होते.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेदना होत असलेल्या महिलेला आपत्कालीन विभागात घेऊन जाऊन उपचार केले.संबंधित महिलेची ऍडमिट करण्यासारखी परिस्थिती नव्हती.टाके काढून रुग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेला घरी पाठवले.संबंधित महिलेची परिस्थिती नाजूक असली असती तर आम्ही पुन्हा एकदा ऍडमिट करून घेतले असते.तसेच त्या महिलेने प्रसूती झाल्यानंतर डिस्चार्ज घेताना,हॉस्पिटल बाबत कौतुकास्पद पत्र लिहून दिले आहे.प्रत्येक रुग्ण ज्यावेळी डिस्चार्ज होतो त्यावेळी आम्ही त्यांच्याकडून रुग्णालयाच्या सुविधांबाबत प्रतिक्रिया लेखी स्वरूपात घेतो.त्यावेळी त्या महिलेने तक्रार केली असती तर आम्ही ताबडतोब कारवाई केली असती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login