सोलापूर बातमीआरोग्यमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि एसीएस हॉस्पिटल सोलापूर त्यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नामवंत अशा एसीएस हॉस्पिटलमध्ये सदर हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार तर प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, भाजपा प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळये, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बडवे, मराठा समाजाचे नेते माऊली पवार, ठाकरे गटाचे युवा सेनाप्रमुख विठ्ठल वानकर , सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांनी फिटनेस संदर्भात माहिती देत दररोज किमान पाच ते दहा किलोमीटर रनिंग केले पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेच असल्याचा मत व्यक्त केल.

पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्यासोबत कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे , असा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य यांनी उपस्थित तज्ञ डॉक्टर आणि इतर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

पत्रकाराचे धावपळ काय असते हे मी जवळून पाहिले आणि अनुभवले सुद्धा… त्यामुळे प्रत्येक पत्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी ही घेतलीच पाहिजे असे मत शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.

हृदयरोग तपासणी शिबिरा अगोदर एसीएस हॉस्पिटलचे डॉ. सिद्धांत गांधी यांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्यांदा काय केले पाहिजे या संदर्भातील प्रात्यक्षिक सर्वांना दाखवले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये इसीजी, 2D इको, बीपी , शुगर या सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. सर्व पत्रकारांच्या तपासणीसाठी डॉ. सिद्धांत गांधी, डॉ.प्रमोद पवार, डॉ. राहुल कारमुंगी , डॉ. दीपक गायकवाड या सर्व हृदयरोग तज्ञांनी परिश्रम घेतले. या हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये शंभर पेक्षा अधिक पत्रकार , पत्रकारितेतर कर्मचारी, आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक आदेप्पा यांनी केले तर आभार डॉ. दीपक गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच एसीएस हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)