राजकीय

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येईल…

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येईल. महाविकास आघाडी तुटेल. त्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची वेळच येणार नाही, असा दावा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधल्या एका बड्या नेत्याने केला आहे.

काँग्रेसने आजच सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले नेते आशीष देशमुख यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, हे पुन्हा एकदा खरे ठरणार का, याचीच चर्चा सुरू झालीय.

चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काही दिवसांपूर्वी सुनावणी आली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही तुमचे सरकार आणले असते, इथपर्यंत सरन्यायाधीशांनी टिपण्णी केली. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे आदेश दिले.

कारवाईची गरज नाही

आता विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार, शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वीच आशीष देशमुख यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येईल. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करण्याची गरजच पडणार नाही. ही कारवाई सहा वर्षांसाठी असेल. ती झाली, तर अनेकांचे राजकीय करिअर संपेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

भाजपसोबत जाणार

कोणालाही अपात्र व्हायला आवडणार नाही. एखादा पक्ष, नेता आपला आमदार अपात्र होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हे पाहता सध्याच्या महाविकास आघाडीमधल्या जागावाटप चर्चेला अर्थ नाही. कधीही उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे गट एकत्र येऊ शकतो. त्यानंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाऊ शकते, असा दावा देशमुख यांनी केला.

कारवाईनंतर दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केल्याबद्दल आशीष देशमुख यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. देशमुख यांनी काँग्रेसमधून 7 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता 23 मे त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळेच देशमुखांनी असा दावा केला आहे का, याचीही चर्चा सुरू आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)