Solapur court matterन्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्मप्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…

लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण नागनाथ उंबरे (रा. नरोटेवाडी, उत्तर सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रवीण याने तिला खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत दुष्कर्म केले. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक – ५६४/२०२४ दि. २६/११/२०२४ रोजी भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ च्या कलम ६९, ११५(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.पीडिते व आरोपी यांची ओळख मागील दोन वर्षांपासून होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळानंतर फिर्यादीने आरोपीस स्पष्ट सांगितले की, ती वैवाहिक असल्याने तिच्या प्रेमसंबंधाबाबत कुटुंबाला समजल्यानंतर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे हे संबंध थांबवणे योग्य ठरेल. आरोपी काही दिवस दूर राहिला, परंतु त्यानंतरही त्याने पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, “माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करतो” असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. मात्र, लग्नाविषयी विचारणा केल्यावर आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेला घराबाहेर काढले. याप्रकरणी पीडितेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. केंद्रे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन सशर्त मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. सौरभ साळुंखे, ॲड. ओंकार फडतरे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)