महाराष्ट्र

श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार का? बोनी कपूर म्हणाले

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2018 साली त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये पोळकी निर्माण झाले होते.

बॉलिवूडची चाँदनी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांच्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यावर बायोपिकबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

श्रीदेवीवर यांच्यावर कधीही बायोपिक बनवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘मी तिच्यावर कधीही बायोपिक बनवणार नाही. तिच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या अनेक ऑफर मला आल्या, पण मी त्यासाठी तयार नाही. ही माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक बाब आहे, श्रीदेवीच्या आयुष्यावर किंवा तिच्याबद्दल काही जण पुस्तक लिहित आहेत. तिच्या आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिण्याचीदेखील माझी इच्छा नाही.”

बोनी कपूर पुढे म्हणाले,”श्रीदेवी आणि माझी लव्हस्टोरी ही आमची वैयक्तिक बाब आहे. श्री ही कायमच माझ्या जवळ असणार आहे. आम्ही कसे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि संसार थाटला ही आमची वैयक्तिक बाब आहे. यावर एखादी कलाकृती होऊ नये”. बोनी कपूर यांच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

आमची लव्हस्टोरी नेहमीच माझी वैयक्तिक असेल, श्री माझ्या हृदयाच्या जवळ आहे. आम्ही प्रेमात कसे पडलो आणि लग्न कसे केले ही माझी वैयक्तिक बाब आहे, जी मला प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार नाही’. बोनी कपूर यांच्या या निर्णयामुळे चाहते नाराज झाले आहेत. श्रीदेवीनंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूर सिनेसृष्टीत सक्रीय झाली आहे. धडक या सिनेमातून जान्हवीनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

श्रीदेवी यांनी ‘हिम्मतवाला’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतही अभिनेत्रीने काम केलं. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia