सोलापूर महानगरपालिकासोलापूर बातमी

सोलापूर मनपाची धडक कारवाई :रंगभवन व पोटपाडी चौकातील अतिक्रमण हटवले.

सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने आज शहरातील रंग भवन चौक व पोटपाडी चौक परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या चारचाकी गाड्या तसेच अनधिकृत खोके हटवण्यात आले.

या कारवाईस स्वतः सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे उपस्थित होते. नागरिकांना स्वच्छ, मोकळे आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध व्हावेत तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांना आळा बसावा, यासाठी ही मोहिम राबविण्यात आली असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले.

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच संबंधित पथक उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून मनपाच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

👉 नागरिकांना आवाहन करण्यात आले की, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बांधकामे किंवा गाड्या उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)