महाराष्ट्रराजकीय

अमित शहा दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (बुधवार) रात्री दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत आहेत. मुंबईच्या महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर हा त्यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे.

गुरुवारी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा करणार आहेत. त्यानंतर पक्षीय बैठक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसीय नागपूर दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी काल मंगळवारी पोलिस आयुक्तांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली.

वर्धा रोडवरील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये अमित शहा थांबणार असून रात्रीपासूनच या हॉटेलबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. बीडीडीएसकडून एनसीआय परिसरात तपासणी केली जात आहे. अमित शाहांसाठी स्पेशल बुलेटप्रूफ वाहनही नागपूरला आले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल केला जाण्याची शक्यता आहे.

मोहन भागवतही घेणार भेट

अमित शहांच्या दोन दिवसीय दौऱ्यात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्धाटन होणार आहे. त्यानंतर पक्षीय बैठक होण्याचा संभव आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांची अमित शहा भेट घेणार आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia