महाराष्ट्र

एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला -संजय राऊत

एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

कोण कोणासोबत? पूर्ण संभ्रम

तसेच, अजित पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आज पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता ‘मला त्याबाबत काही माहिती नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशेष म्हणजे शरद पवार यांनी हा दावा फेटाळला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच नेमके कोण कोणासोबत? याबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

ईडीच्या भीतीने शिंदेंचे बंड

तुरुंगात जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केल आहे. तसेच, आपण भाजपमध्ये गेलो नाही तर तुरुंगात जाऊ, अशी भीतीही मातोश्रीवर एकनाथ शिंदेंनी वर्तवली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे 40 आमदार हे ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले. ईडीच्या भीतीनेच त्यांनी शिवसेनेत बंड केले आहे. त्यांचा हिंदुत्वाचा दावा धादांत खोटा आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ईडीकडून छळ

शिंदे गटाला ज्याप्रमाणे ईडीची भीती दाखवून बंड करायला लावले, तसाच प्रयोग सध्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विविध प्रकरणांची भीती दाखवून त्रास दिला जात आहे, असा गौप्यस्फोट पुढे संजय राऊतांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण फुटणार किंवा कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली बंड होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शरद पवारांची खेळी काय?

दरम्यान, विरोधी पक्षनेते असूनही अजित पवार भाजपबाबत नरमाईची भूमिका घेत आहेत. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जातील, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आज शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांबाबत मला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. विशेष म्हणजे शरद पवारांनी अंजली दमानियांचा दावा फेटाळला नाही. त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून शरद पवार किंवा अजित पवारांची नेमकी खेळी काय? भूमिका काय?, असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राहुल गांधींच्या बैठकीला शरद पवारांची दांडी

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवरुन खटके उडताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होताना दिसत आहे. काल राहुल गांधी यांनी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांनी बैठक बोलावली होती. त्यात तेजस्वी यादव, नितीशकुमार यादव, आपचे नेते व मल्लिकार्जुन खरगे आदी नेते सहभागी झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस या बैठकीत सहभागी झाली नाही. त्यामुळे पुन्हा मविआतील बिघाडीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

शरद पवार उद्या दिल्लीत

दरम्यान, काल राहुल गांधींनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीकडून कोणीच का हजेरी लावली नाही?, यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, राहुल गांधींनी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीसाठी मलाही बोलावण्यात आले होते. तेव्हा माझे पुण्यात काही काम होते. त्यामुळे दिल्लीला जाता आले नाही. मात्र, मी उद्या दिल्लीला जात आहे, तेव्हा राहुल गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करेल.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia