सोलापूर राजकीय

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फोटोचे प्रकाशन व अभिवादन कार्यक्रम संपन्न

सोलापूर ( प्रतिनीधी):- क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ लष्कर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वव्या जयंतीनिमित्त देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आ. कु. प्रणितीताई शिंदे, संयोजक सुरेश पाटोळे, वरिष्ठ नेते राजाभाऊ सरवदे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, लष्कर मातंग समाज अध्यक्ष भिमराव दाजी गायकवाड,माजी महापौर अबुटे ताई, किशोर जाधव सर ,राँकी बंगाळे ,विश्वेश्वर गायकवाड,युवा उद्योजक राजु आसादे, ओंकार पाटोळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, बाबा करंगुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रकाशाचा कार्यक्रम व अभिवादन संपन्न झाला.

यावेळी संयोजक तथा क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी माहिती देताना सांगितले की, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी परिश्रमपूर्वक भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. या राज्यघटनेमुळेच हा देश अखंड आहे. राज्यघटनेच्या रक्षणासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून आजचा पोस्टर प्रकाशन व वितरणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी सर्व देशवासीयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)