राजकीयसोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापुरात दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी सहा लाख रुपयांची मदत जाहीर

सोलापुरात दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबीयांची पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून वैयक्तित निधीतून मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाखांची मदत करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी दिलेले मृत्यूचे कारण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खोडून काढले आहे. मनपा आयुक्त सचिन ओम्बसे यांनी मुलींचा मृत्यू डेंग्यू सदृश्य तापाने झाल्याचा दावा केला होता. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरेंनी हा दावा खोडून काढला आहे. दोन मुलींचा मृत्यू ही दुर्दैवी बाब असून तिसरी मुलगी सिरीयस आहे. त्यामुळं तिसऱ्या मुलीला गरज भासल्यास खासगी रुग्णालयात उपचार देणार आहे. पालकमंत्र्यांनी मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना वैयक्तिक 1 लाखाची मदत केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.