सोलापूर:मुस्लिम तरुणाचे राम सातपुतेंना आव्हान
मशिदीं मध्ये प्रचाराचे पुरावे दाखवा,सातपुतेना पाच लाख रुपयांचे बक्षीस देतो

सोलापूर:सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार राम सातपुते यांना सोलापुरातील एका मुस्लिम तरुणाने आव्हान दिले आहे.मशिदींमध्ये कोणत्याही पक्षाचा प्रचार होत असेल आणि राम सातपुते यांनी पुरावे दाखवल्यास सातपुते यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस देतो.मुस्लिम युवकाच्या आव्हाना नंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मशिदीं मध्ये काँग्रेसचे फतवे निघत आहेत,त्याविरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे,अशी प्रतिक्रिया दिली होती.यावर मुस्लिम समाज नाराज झाला असून राम सातपुते विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे.
सईद नाईकवडी या मुस्लिम तरुणाने राम सातपुते यांनी पुरावे दाखवल्यास थेट सातपुतेंनाच बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. सईद नाईकवाडी हा तरुण सोलापूर शहरात सामाजिक क्षेत्रात काम करत आहे.
*एमआयएमने उमेदवार न दिल्याने राम सातपुते आरोप करत आहेत-
एमआयएम पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षकांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न दिल्याने भाजप मध्ये अस्वस्थता पसरली आहे.एमआयएमने उमेदवार दिला असता तर मुस्लिम मतांच विभाजन झाले असते,आणि मतांच्या विभाजनाचा फायदा भाजप उमेदवाराला झाला असता.त्यामुळे महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे काँग्रेसवर आरोप करत आहेत.मशिदीं मध्ये कोणत्याही पक्षाबाबत साधी चर्चा देखील केली जात नाही असे सईद नाईकवाडी यांनी स्पष्ट केले.
*राम सातपुतेनी पुरावे दाखवल्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देतो-
एमआयएम सोलापूर लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा होताच मुस्लिम समाज काँग्रेसकडे जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मशिदीं मधून काँग्रेसचा प्रचार होत असल्याचे विधान केले आहे.मशिदीं मधील मौलवी हे मोदींना पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे फतवे काढत आहेत.सईद नाईकवाडी या तरुणाने राम सातपुते यांनी पुरावे दाखवल्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देऊ असे आव्हान केले आहे.मशिदीं मध्ये प्रार्थने शिवाय दुसरी कसलीही चर्चा होत नाही असा दावा मुस्लिम तरुणाने केला आहे.