जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापुरातील मजरेवाडी तलाठी पवनकुमार चव्हाण यांच्याकडून नागरिकांची होतेय पिळवणूक ….

सोलापूर येथील मजरेवाडी हे मोठा परिसर असणारा महसुली गाव आहे… मजरेवाडी मध्ये नई जिंदगी जुळे सोलापूर सह अनेक भाग या महसुली गावात येतात. मजरेवाडी भागात अनेक मोठमोठे शेत हे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्याने प्लॉट पाडून विकून अनेक ठिकाणी मोठमोठे घर बंगले अपार्टमेंट तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी झालेल्या प्लॉटचे नोंदीसाठी तलाठी कार्यालय मजरेवाडी येथे नेहमीच नागरिकांना संपर्कात राहावे लागते… आणि सातबारा उतारावरील नोंदीसाठी नागरिकांचा मोठा ओढा या कार्यालयाकडे असला तरी या कार्यालयात मात्र काही लोकांचे तोंड बघून काम होत असल्याने सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे… मजरेवाडी भागाला सध्या पवनकुमार चव्हाण या नावाचे तलाठी असून हे तलाठी महोदय मात्र नेहमीच कार्यालयात नसतात आणि फोनही बंद ठेवतात… मात्र एक कमालीचे बाब म्हणजे हे कार्यालयात नसले तरी फोन बंद असला तरी मात्र त्यांच्या मर्जीतील काही लोकांची कामे मात्र बिन दिकतपणे होत असतात पण सामान्य लोकांचे काम करण्यासाठी या महोदयाकडे वेळ नाही…. असाच एक प्रकार सध्या लोकप्रहार न्यूज च्या हाती लागला आहे…
मजरेवाडी येथे मतीन मंगरुळे नामक व्यक्तीने एक जागा खरेदी केली असून त्या जागा खरेदी केल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी वीस मार्च 2024 रोजी त्यांनी तलाठी कार्यालय मजरेवाडी येथे सदरचे प्रकरण दाखल केले आहे पण अडीच महिने झाले असले तरी सदर प्रकरणातील व्यक्तीची नोटीस ही साधी निघाली नाही आणि या दरम्यान अनेक एजंट दलाल यांचे हजारो नोटीस या तलाठी पवनकुमार चव्हाण यांच्याकडून करण्यात आले हे सुद्धा आपणास पहावयास मिळेल. एकंदरीत सामान्य लोकांचे आणि ज्या कामांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण होत नाही ते काम मात्र पद्धतशीरपणे अडवून ठेवायचे आणि ज्याचे साठे-लोटे झालेले आहे ते मात्र अगदी इमानदारीने काम करण्याचे काम तलाठी यांच्याकडून होत आहे असा आरोप सदर प्रकरणातील व्यक्तीने केला आहे. याबाबतचे अधिक माहिती सरफराज मंगरूळ यांनी लोकप्रहार न्यूज बोलताना दिली त्यांनी काय आरोप केले काय प्रकरण आहे हे पाहू या नक्कीच….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.