सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीय

कामगार सेनेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिन जल्लोषात साजरा

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाने व जल्लोषात साजरा करण्यात आला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार सेना कार्यालयात (पद्मशाली चौक) येथे साजरा करण्यात आला प्रारंभी आई तुळजाभवानी, श्री छत्रपती शिवाजी महाराज, व शिवसेनाप्रमुख यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व सोलापूर महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर शिवसेना प्रमुखांचे मोठे कट ऑऊट लाऊन जल्लोष करताना शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद , शिवसेना जिंदाबाद , उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है , आदित्य साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है , अशा घोषणा दिल्या नंतर एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. सदर प्रसंगी शहर मध्ये समन्वयक,अमित भोसले , उपशहर प्रमुख शिवा ढोकळे , उपशहर प्रमुख धनराज जानकर , उपशहर प्रमुख अनिल दंडगुळे , उपशहर प्रमुख सोमनाथ बंदपट्टे शहर मध्य संघटक जरगशीश मुल्ला , प्रसाद जगताप , अभिषेक चिलका , पप्पू शेख , लक्ष्मीकांत कोडम , रमेश चलवेरी , श्रीनिवास बोगा , गुरुनाथ कोळी , बालाजी भंडारी , शरणाप्पा जंगले , युवती सेनेचे शहर संघटिका रेखा आडकी , बिडी कामगार नेत्या शोभा पोला , यलव्वा पेंटा , हिरामणी मामड्याला , विजयालक्ष्मी मामड्याला ,व विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————–
फोटोमँटर :- शिवसेना वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालय येथे वर्धापन दिन साजरा करताना विष्णू कारमपुरी (महाराज) अमित भोसले, धनराज जानकर, अनिल दंडगुळे, जरगीस मुल्ला, रेखा आडकी, शिवा ढोकळे शिवसेनेचे पदाधिकारी व बिडी कामगार महिला दिसत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login