महाराष्ट्र

६ फूट कोब्राचे रेस्क्यू आणि त्वरित रिलीज – पैगंबर शेख

सकाळी शिंदे काकांचा फोन आला आणि म्हणाले वारजे स्मशानभूमीत नाग निघाला आहे. थोड्या वेळात मी वारजे स्मशानभूमीत पोहोचलो. पाहतो तर नाग स्मशानभूमीत न्हवता तर तो त्याच्या नैसर्गिक अधिवासातच होता. तो उंदराची शिकार करत होता. आणि उंदीर बिळात जास्तच अडचणीत गेल्यामुळे त्याला तो बाहेर काढता येत न्हवता. त्याची धडपड सुरू होती पण तो अंतिमतः अपयशी ठरला.

मी म्हणालो, याला कशाला नक्की रेस्क्यू करायचे ? हा लहानाचा मोठा इथेच झाला आहे. हा याचाच परिसर. याच्याच परिसरातून उचलून याला अजून कुठे नैसर्गिक अधिवासात न्यायचे ? आणि त्याला इथून नेल्यावर या उंदीर घुशी कोण खाणार ? मग सगळेजण यावर सहमत झाले. तरीही थोडा पुढे झाडीत सोडा असे बोलल्याने नाग साहेबांना पकडले. धरल्या धरल्या, मी काय नॉर्मल साप वाटलो काय ? हा भाव नागाच्या एकूण वागण्या वरून दिसून आला. भलताच रागीट होता. तरीही त्याला थोडे शांत केले आणि नदीच्या बाजूला झाडीत सोडून दिले. जाताना पण ‘पुढच्या वेळी बघून घेईल’ या आवेशातच साहेब गेले.

पृथ्वीवर असलेले वन्य प्राणी आपण वाचवले पाहिजेत. ही आपली जबाबदारी आहे. जसे आपल्याला रहायला जागा लागते तशी त्यांनाही लागते. याचाही विचार इथून पुढे करावा लागेल. सगळं माझंच असं म्हणून चालणार नाही. पृथ्वी ही फक्त मानवांची नाही तर यावर असलेल्या विविध प्राणी आणि पक्षांची पण आहे. त्यांचेही संवर्धन करूयात. #समजलंतरठीक

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login