राजकीय

जेव्हा अजित पवारांनी त्यांना लायकी दाखवली, तेव्हा संजय राऊतांची भाषा बददली – संजय शिरसाट

अजित पवार म्हणाले, तुम्ही मोठे नेते आहात. म्हणजे काय, त्यांना तुम्हाला बोलायचे नाही. असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा अजित पवारांनी त्यांना लायकी दाखवली, तेव्हा संजय राऊतांची भाषा बददली, असा घणाघात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर केला.

राऊतांनी मातोश्रींची पत घालवली
विदर्भात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जाऊन आदित्य ठाकरे यांनी चालण्याचा प्रयोग केला. तर पुढे जाऊन जे विश्व प्रवक्ते आहेत, ते काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधींना भेटले. त्यांच्या गळात गळा घालून ते चालत असल्याचे फोटो त्यांनी दाखवले. मुळात भारत जोडो यात्रेत तुम्हाला कोणते निमंत्रण दिले होते. मातोश्रीबद्दलचा आदर राऊतांनी घालवला, असा आरोप शिरसाटांनी केला.

ठाकरेंना घेऊन तुम्ही सिल्वर ओकवर का गेले?
शरद पवारांच्या सांगण्यावरून ही फाटाफूट केलेली आहे. असे माझे ठाम मत आहे, असे शिरसाट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले संजय राऊत आम्हाला विचारतात की, त्यांचा नेता कोण आहे. त्यावर शिरसाट म्हणाले की, खऱ्या अर्थाने तुम्हाला नेत्याची गरज आहे. कारण, संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभेत ठाकरेंची लायकी अन्य नेत्यांनी काढली. ते म्हणाले की, तुमची लायकी आमच्यापेक्षा मोठी नाही, हे वज्रमूठ मधील नेत्यांनी सांगितले की, तुम्हाला सभा घ्यायची असेल तर आमच्यासोबत बसावे लागेल. तेव्हा तुमचा अभिमान कुठे गेला? एकेकाळी मोदी, अमित शहा मातोश्रीवर येत होते. राष्ट्रपतींचे उमेदवार देखील मातोश्रीवर नमन करत असत. मात्र, आता तुम्हाला सिल्वर ओकवर जावे लागते. तेव्हा तुमचा अभिमान गहाण ठेवला आहे का, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांवर कधी प्रश्न विचारतात का
संजय राऊत सकाळी उठून केवळ टीका करण्याचे काम करतात. ते कधी शेतकऱ्यांवर बोलताना दिसले नाहीत. त्यांना काही दुसरे काम नाही.

सामना दैनिकात फक्त गांधी पवारांचे फोटो
शिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांना एवढेच सांगतो की, उद्धव ठाकरेंना व त्यांच्या गटाला तर त्यांनी बुडवलेच.आता तुम्ही गप्प राहिले पाहिजे. आमची निष्ठा शिवसेनाप्रमुखांवर आहे. आमच्या युतीचे नेते नरेंद्र मोदी आहेत, त्यामुळे आम्ही काही काम करतो त्याला खोडा घालण्याचे काम केले तर राऊतांना यश मिळणार नाही. सामना या दैनिकात गेल्या काही दिवसात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. तर केवळ शरद पवार, राहुल गांधी यांचे फोटो छापले जातात, सामना आता कॉंग्रेसी विचारांचे दैनिक झाले आहे, असा आरोप देखील शिरसाटांनी केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia