महाराष्ट्र

ठाकूर महिला बिडी कामगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर दिनांक 12/4/2023 ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील कर्मचारी व कामगारांचे समस्या सोडविण्याबाबत सुरु असलेल्या आंदोलना आणि प्रशासनाचे कोणतेही सूचना ठाकूर सावदेकर विडी कंपनीचे व्यवस्थापन व मालक मान्य करत नाही उलट कामगारांचे प्रश्न सोडविणे ऐवजी प्रश्न सुटू नये असे प्रयत्न करीत आहेत त्यामुळे बिडी कामगार बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करावे अशा मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना कृती समितीचे निमंत्रक विष्णू कारमपुरी ( महाराज) उपाध्यक्ष श्रीधर गुडेली कार्याध्यक्ष सायबन्ना तेगेल्ली यांच्या नेतृत्वाखाली महिला विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात ठाकूर सावदेकर विडी कंपनी साखर पेठ सोलापूर या कंपनीमध्ये विडी कामगार जवळपास 2 हजार महिला बिडी कामगार काम करत असल्याचे समजते व मानसिक त्रासामुळे नोकरवर्ग व कामगार चे गेल्या एक महिन्यापासून कामगार आयुक्त यांच्याकडे चर्चा होऊन देखील त्यांना न्याय न मिळाल्याने सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आदेश ही व्यवस्थापनाने अमान्य केले या सर्व कृत्यामुळे नोकरवर्ग व स्थापन कर्मचारी यांनी दिनांक 12/3/2023 पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता

तरी देखील व्यवस्थापनाने तोडगा न काढल्याने व कामगारांना न्याय न दिल्याने काम बंद आंदोलन चालू असल्याने गोरगरीब कष्टकरी महिला विडी कामगारांचे गेल्या सहा दिवसांपासून अतोनात नुकसान होत आहे लवकर वर्गाचे त्वरित प्रश्न सोडविण्यात यावा अन्यथा विडी कामगारांच्या उपासमारीला कंपनी व्यवस्थापन व आपण जबाबदार राहणार आहे कृती समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती की कामगारांचा बंद काळातील मजुरी त्वरित मिळण्याकरिता आपण व्यवस्थापनावर सक्तीची कारवाई होऊन किंवा चर्चेतून गोरगरीब कष्टकरी महिला विडी कामगारांना बंद काळातील नुकसान भरपाई त्वरित मिळवून देण्यात यावी कृती समितीच्या वतीने सविनय सादर असे नमूद करण्यात आले आहे विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्रीधर गुडेली, साहेबांना तेगेली, अंबन्ना कोळी, प्रभाकर बाबानगरे, चंद्रकला सुरवसे ,गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुराडकर ,पद्मा ध्यानपल्ली, उमाबाई भैरी, रेखा आडकी, यांच्यासह विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login