‘तु फक्त ही एक गोष्ट कर, तुझ्यासोबत लग्नाला तयार’, प्रसिद्ध अभिनेत्रची मोहम्मद शमीला खुली ऑफर!

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 :भारतीय क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज मोहम्मद शमीयाची गोलंदाजी सर्वांनाच माहिती आहे. आपल्या अप्रतिम गोलंदाजीने मोहम्मद शमी याने अनेक विक्रम रचले आहे. वर्ल्डकपमध्ये त्याची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे.
मोहम्मद शमी त्याच्या खेळीमुळे कायम चर्चेत असतो. पण आता क्रिकेटपटू त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मोहम्मद शमी याच्यासमोर लग्नासाठी खुली ऑफर ठेवली आहे. ज्यामुळे मोहम्मद शमी चर्चेत आला आहे. अशात मोहम्मद शमी याच्याकडे लग्नाची मागणी करणारी अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.
अभिनेत्रीने मोहम्मद शमी याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण अभिनेत्रीने एक अट देखील घातली आहे. मोहम्मद शमी याला लग्नासाठी विचारणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून वादग्रस्त अभिनेत्री पायल घोष आहे.. एक ट्विट करत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.