सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसोलापूर राजकीय

सुभाष देशमुख यांच्या घरी चहा, बंद दाराआड चर्चा, निवेदन अन् मुख्यमंत्र्यांची लगेच घोषणा…

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारचा सोलापूर दौरा चर्चेचा विषय तर ठरलाच मात्र कार्यकर्ते पदाधिकारी यांना ऊर्जा देऊन गेला.

बार्शीचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री विमानतळावर आले हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानाकडे कार्यक्रमासाठी येत असताना वाटत आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांना चहाचे निमंत्रण दिले ते स्वीकारून मुख्यमंत्री फडणवीस दुपारच्या वेळी बापूंच्या निवासस्थानी गेले तिथे कुटुंबांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर फडणवीस, सुभाष देशमुख, मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांनी चहा घेत बंद दाराआड बराच वेळ चर्चा केली.

दरम्यान सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनने दुबई येथे युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन भरविणे तसेच सोलापूरला एक अत्याधुनिक गारमेंट पार्कची उभारणी करणे, सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फतच गणवेश पुरविण्याचे काम स्थानिक पातळीवर व्हावे या तीन प्रमुख मागण्या करिता सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनने भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली आणि तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

मेळाव्यामध्ये फडणवीस यांनी गारमेंट या विषयी बोलताना दुबई येथे गारमेंट प्रदर्शन भरणार आहे त्याठिकाणी महाराष्ट्र सरकार पार्टनर बनेल आणि तिथे सोलापूरच्या गारमेंटचे प्रदर्शन लावू. सोलापूरची संस्कृती ही टेक्सटाइल ची आहे. सोलापूरला देशात नावच चादर, टेक्सटाइल, टॉवेल मुळे मिळाले त्यामुळे एक आधुनिक गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा त्यांनी केली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)