सोलापूर बातमीसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक
ग्रामपंचायत गटातील आमदार सुभाष देशमुख गटाचे 5 पैकी 3 उमेदवार विजयी…

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत यामध्ये पाच जागाचे जे निकाल आहेत ते समोर आलेले आहेत. पाच मध्ये चार ग्रामपंचायत तर एक हमाल तोला मतदारसंघाचे निकाल समोर आलेले आहेत यात सुभाष देशमुख पॅनलचे तीन उमेदवार हे निवडून आलेले आहेत. यामध्ये मनीश देशमुख, राचप्पा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड हे तिघेही सुभाष देशमुख गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर कल्याण शेट्टी माने गटाचे सुनील कळके विजयी झालेले आहेत. तर हमाल तोलार गटातून दिलीप माने समर्थक गफार जब्बार चांदा हे विजयी ठरले आहेत. 18 पैकी पाच जागांचे निकाल हे समोर आलेले आहेत. यामध्ये देशमुख गटाचे तीन तर कल्याण सिटी गटाचे दोन उमेदवार विजयी ठरले आहेत…



