सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापूरात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा टाहो, माहेरून गाडी आणि सोन्यासाठी मारहाण!

सोलापूर : माहेरून वाहन खरेदीसाठी पैसे आणि सोन्याचे दागिने आणले नाहीत म्हणून राजस्थानच्या जोधपूर येथील सासरच्या मंडळींनी सोलापुरातील विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.

जोडभावी पेठ पोलीस ठाणे – गु.र.नं. ८००/२०२६
भा. न्या. सं. कलम ८५, ११५, ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा.

फिर्यादी :- शितल विपुल तिवारी, रा. अ २ मंत्रीचंदक कॉम्प्लेक्स, न्यु बुधवार पेठ, सोलापूर
आरोपी :- १) विपुल तिवारी, २) कमलनाथ तिवारी, ३) गिता तिवारी, ४) मुकुल तिवारी, ५) अर्चना तिवारी, ६) अर्पित तिवारी, ७) दिलीपसिंह पवार, सर्व रा. जोधपूर राजस्थान

संतापजनक हकीकत अशी की –

दि. २५/११/२०२२ रोजी ते दि. १३/०३/२०२५ चे दरम्यान, फिर्यादीचे सासरी जोधपूर येथे आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादीस –

“आमचे विरुद्ध केस का केली तसेच मा. उच्च न्यायालयात त्याचेकडे असणारे फिर्यादीचे स्त्री धन मागितले, माहेरून वाहन खरेदीसाठी पैसे व सोन्याचे दागिने आणले नाहीत” अशा काही ना काही कारणावरून वारंवार मारहाण व शिवीगाळ करून मानसिक शारीरिक त्रास दिला आहे.

इतकेच नाही तर आरोपीत क्रं. ७ याने फिर्यादीस “विपुल बरोबर कशाला नांदतेस निघून जा” असा अपमान करून घृणास्पद शिवीगाळ केली आहे.

सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या जाचाला आणि हुंड्याच्या मागणीसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेने पोलिसात धाव घेतली आहे. राजस्थानातून सोलापुरात नांदायला आलेल्या या महिलेवर झालेला अत्याचार हा संतापजनक असून या नराधम सासरच्या मंडळींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

तपास :- सपोनि/ डोईफोडे हे करीत आहेत.!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel