महाराष्ट्र

वादळी वाऱ्यात झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू…

वादळी वाऱ्यात झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपुरातील सांगोल्यात जवळा येथील लेंडी ओढ्यात ही घटना घडली.

कस्तुरा साधू जाधव असे या मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे.

अचानक आलेल्या वावटळीत पालासकट झोळी उडून झोळीत झोपलेल्या बाळावर पडली. डोक्याला जबर मार लागल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाला. मृत बाळाच्या आईने व कुटुंबीयांनी घटनेनंतर टाहो फोडल्याने उपस्थितांनाही हळहळ व्यक्त केली.

नेमके घडले काय?

सोनंद येथील साधू अण्णा चव्हाण हे पत्नी व बाळास घेऊन गुरूवारी सकाळी जवळा तालुक्यात जात प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता आले होते. उपचारानंतर सर्व कुटुंबीय घेरडी रोड वरील लेंडी ओढ्याच्या पटांगणात टाकलेल्या पालावर आले.

बाहेर प्रचंड ऊन असल्याने बाळाला पालातील झोळीत झोपवून पती पत्नीही पालात विश्रांती घेत होते. त्यावेळी दुपारी अचानक सूटलेल्या वादळी वाऱ्यामुळे झोळीसकट पाल उंच उडाली.

धुळीमुळे काही कळण्याच्या आत ही घटना घडली. कुटुंबीयांच्या गोंधळानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी झोळीत झोपलेली कस्तुरा खाली पडलेली होती. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. तिला उपचाराकरता प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, सरपंच सुषमा घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण घुले पोलीस पाटील अतुल गयाळी, तलाठी विकास माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित कुटुंबाला धीर देत शासकीय मदतीचा प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठवला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login