सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरातील कस्तुरबा नगरमध्ये प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग; मोठे नुकसान, जीवितहानी टळली

सोलापूर : शहरातील नई जिंदगी परिसरातील कस्तुरबा नगर येथे रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लास्टिकच्या गोडाऊनला लागलेल्या या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास अचानक गोडाऊनमधून धूर व ज्वाळा निघताना दिसू लागल्या. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग वेगाने पसरत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या सात ते आठ पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्लास्टिक साहित्य असल्यामुळे आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली असून अजूनही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी जीवापाड प्रयत्न करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस व संबंधित यंत्रणा याबाबत…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel