सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

भक्तीमय वतावरणात भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती…

हजारो भाविकांनी केले संगमध्ये शाही स्नान...

महाशिवरात्रीनिमित्त हत्तरसंग कुडल (दक्षिण सोलापूर) येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवारी दि. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भक्तीमय वातावरणात संगम आरती करण्यात आली.
प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते यांच्याहस्ते संगम आरती करण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर या दाम्पत्यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. दरम्यान यंदा 144 वर्षनंतर आल्यानंतर प्रयागराज येथे असलेल्या कुंभमेळ्यामुळे कुडल भीमा- सीना संगम नदीच्या पवित्र स्थळी हजारो भाविकांनी सकाळपासूनच स्नानासाठी गर्दी केली होती.
दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती आणण्यात आली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सूर्यास्ताच्या वेळी काशीच्या धर्तीवर भीमा-सीना नद्यांच्या संगम घाटावर भक्तिमय वातावरणात संगम आरती करण्यात आली.
कृषी संस्कृतीचा विकास व्हावा, भीमा-सीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत रहावा, नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यंदा आरतीचे सहावे वर्ष आहे.
तत्पूर्वी पहाटेच्या सुमारास श्रींच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगातील एकमेव दुर्मिळ अशा बहुमुखी शिवलिंगाचा अभिषेक करून, पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासूनच रांग लागली होती. बहुमुखी शिवलिंग, संगमेश्वरांचे शिवलिंग, पंचमुखी परमेश्वर शिवलिंगास बिल्वरचन पत्र अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
तसेच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. बिराजदार हे गेल्या 22 वर्षापासून हे महाप्रसाद व्यवस्था करत आहेत.
संगम आरतीस चनगोंडा हविनाळे, संगप्पा केरके , मधुकर बिराजदार, आण्णाराव पाटील, मल्लप्पा पाटील, चन्नप्पा बगले, बाबुराव पाटील, पंडीत पुजारी, देविन्द्रप्पा पाटील, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार हणमंत बगले उपस्थित होते.
सूत्रसंचालन हणमंत बगले, प्रास्ताविक संगमेश जेऊरे तर संगप्‍पा केरके यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली तर अण्णाराव पाटील यांनी आभार मानले.

प्रयगराज मध्ये जे सध्या कुंभमेळामध्ये भक्ती दिसून येते, कुडल येथे दोन भाषा, दोन तालुका, दोन संस्कृती, भक्ती शक्तीचा संगम दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यात्मिक आता क्षेत्रातील पर्यटनाला सकारात्मक विकास करण्यास प्राधान्य दिले आहेत.

हत्तरसंग कुडल संगम येथे संगम आरती करताना आ. सुभाष देशमुख, सुरेश निंबाळकर यांच्यासह मान्यवर

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.